श्रीअनंता मधुसूदना ।
पद्मनाभा नारायणा ॥१॥
सकळदेवा आदिदेवा ।
कृपाळुवा जी केशवा ।
महानंदा महानुभावा ।
सदाशिवा सहजरूपा ॥२॥
अगा ये सगुणा निर्गुणा ।
जगज्जनित्या जगज्जीवना ।
वसुदेवदेवकीनंदना ।
बाळरांगणा बाळकृष्णा ॥३॥
तुका आला लोटांगणी ।
मज ठाव द्यावा जी चरणीं ।
हे चि करीतसें विनवणी ।
भवबंधनीं सोडवावें ॥४॥
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें